झोंब_marathi Kavita sangrah_title poem
झोंब...
रानटी मी मराठी, का बोलतात सारे
तेजोमयी अर्कास, आज हासतात तारे...
मातीवरचा हक्क, सांगणारे परके
भूमीत स्वतःच्या आज, झुंजतात का रे...?
नोकरी चाकरी, असा छंद आमुचा
आरोपांचे या आज, झोंबतात वारे...
न गाजविला अधिकार, स्वतःच्याच घरावरी
पाहुणेच घुसूनी आज, लावतात दारे...
Veenatmja@zomb Kavita sangrah
(Dr. Asmita Vaidya Patil)
Comments
Post a Comment