डबक्यातील देवमासा क्षमतेच्या क्षितिजापार, तिच्या इच्छांचं द्वार मुलाच्या दप्तरात मात्र, सुंदर स्वप्नांची कार... इकडे अव्वल, तिकडे अव्वल डबक्यातील देवमासा समुद्राची शिंपली बनु, मुलाची ही इवली आशा... जगापुढे धावावं, सदा विजयी व्हावं तिच्याच मनासारखं, गीत त्याने गावं... आकांक्षेची गरुडझेप, तिने घेतली गगनी इटुकलं पिटुकलं बाळ, कोमजलं आज मनोमनी... त्यांनेच मग मोडली, त्याच्या स्वप्नांची कार ! बनूनी डबक्यातील देवमासा, हसूही आणले उधार...! Zomb kavita sangrah Veenatmja (Dr. Asmita Vaidya Patil)
Comments
Post a Comment